मुंबई : कलाविश्वात घोंगावणारे #Me Tooचे प्रकरण आता क्रिकेट पर्यंत येऊन पोहचले आहेत. न्यूझीलंडच्या एका खेळाडूविरोधात पोस्टर दाखवून घोषणाबाजी करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात हा सर्व प्रकार पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या भारत आणि न्यूझीलंड या संघात ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना ऑकलंड येथील एडन पार्कवर खेळला गेला. हा सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांकडे हा पोस्टर पाहायला मिळाला. या पोस्टरवर कोणत्याच खेळाडूच्या नावाचा उल्लेख नव्हता. पण याप्रकरणासोबत न्यूझीलंडचा खेळाडू स्कॉट कॅगीलेन याचे नाव जोडले जात आहे. तसेच त्याच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.



क्रिकेट सामन्या दरम्यान पाहायला मिळालेल्या या पोस्टर वर ''वेक अप न्यूझीलंड क्रिकेट Me Too''असे लिहिले होते. कॅगीलेनवर १७ मे २०१५ साली बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळे त्याला जनतेचा रोषाचा सामना करावा लागला होता. या प्रकरणावर २०१६ साली सुनावणीची सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात कॅगीलेनची २०१७ ला फेब्रुवारी महिन्यात निर्दोष म्हणून सोडण्यात आले होते. तरीदेखील कॅगीलेन विरोधात असलेला जनतेतील रोष काही कमी झालेला नाही. हेच या प्रकरणातून समोर आले आहे.