India vs Australia 3rd Test Day 5 Live Updates : भारताची विजयी मोहोर, ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी पराभव
जाणून घ्या सामन्याच्या सर्व अपडेट्स
मुंबई : India vs Australia 3rd Test Day 5 Live Updates
मेलबर्न येथे सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी सुरुवातीच्या काही क्षणांमध्येच भारतीय क्रिकेट संघाची विजयी पताका उंचावेल असं वाटत असतानाच पावसाने मात्र ऑस्ट्रेलियन संघाला कौल दिला आणि खेळ सुरु होण्याआधीच त्यात अडथळा आला. या कसोटी सामन्यात विजयापासून अवघ्या दोन विकेट दूर असणाऱ्या भारतीय खेळाडूंची प्रतिक्षा मात्र पावसाने ताणून धरली.
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने दिलेल्या ३९९ धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मैदानात पदार्पण केलं. पण, जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना फार काळ खेळपट्टीवर टीकता आलं नाही. त्याला साथ मिळाली ती म्हणजे रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा यांची.
शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाची मधली फळी काही काळ खेळती ठेवली. पण, तोसुद्धा बुमराहच्या चेंडूवर बाद झाला. मार्शनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पाहता पाहता गोंधळला आणि एक-एक खेळाडू तंबूत परतले. चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यास काही तास शिल्लक असातानाच पॅट कमिन्स या खेळाडूने संघाची धावसंख्या सुधारण्यात योगदान दिलं आणि भारताचा विजय लांबणीवर नेला. संघाचे आठ खेळाडू तंबूत परतल्यामुळे पॅट तितकाच संयमी खेळताना दिसला.
चौथ्या दिवशी बिनबाद राहत पॅटने ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या असल्या तरीही भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाचव्या दिवसाच्या खेळाचू सुरुवात होण्यापूर्वीच या ऐतिहासिक विजयी मोहोर भारतीय संघाच्या नावावर कधी उमटणार अशी उत्सुकता खेळाडूंसोबतच क्रीडारसिकांनाही लागलेली होती. पावसाच्या व्यत्ययानंतर सुरु झालेला खेळा आता नेमका कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
* भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला रोखलं. दहाव्या विकेसह ऑस्ट्रेलिया १३७ धावांनी पराभूत. इशांत शर्माच्या चेंडूवर एन. लायन झेलबाद
*जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर पुजाराला झेल देत कमिन्स बाद
*ऑस्ट्रेलियाला नववा झटका, पॅट कमिन्स तंबूत परत
*पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत.
*आकाश निरभ्र होण्याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.