Mumbai Indians IPL 2023 Playoffs Scenario:  नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने हैदराबादचा (GT vs SRH) पराभव केलाय. या विजयासह गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये क्वालिफाय (IPL 2023 Playoffs) करणारा पहिला संघ बनला आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) प्लेऑफमध्ये पोहोचण्याची 90% शक्यता आहे. 15 गुणांसह चेन्नई दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स (MI) प्लऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 80% आहे. त्याचबरोबर लखनऊ सुपर जायट्न्स (LSG) प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 61% आहे.


कसं असेल मुंबईचं गणित?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 80% आहे. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यात 7 विजयासह 14 गुण मुंबईच्या खात्यावर आहेत. मुंबईचा आजचा सामना लखनऊ सुपर जायन्ट्सशी होणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून 16 अंकासह प्लेऑफ गाठण्याची तयारी रोहित अँक कंपनी करणार आहे.


आणखी वाचा - MS Dhoni ची ऑटोग्राफ घेतल्यानंतर Sunil Gavaskar भावूक, म्हणतात "आयुष्याच्या अखेरच्या क्षणात...", पाहा Video


मुंबईचा नेगेटिव्ह रनरेट 


मुंबईचा सध्याच्या रनरेट नेगेटिव्ह आहे. त्यामुळे रोहित शर्माची चिंता वाढलीये. - 0.117 पाईंट्सह रोहित ब्रिगड तिसऱ्या स्थानी आहे. मात्र, उर्वरित सामन्यात एक पराभव मुंबईला प्लेऑफबाहेर टाकू शकतो. तर त्याच्या जागी पॉझिटिव्ह रनरेट असलेल्या आरसीबीला (RCB) प्लेऑफमध्ये संधी मिळू शकते. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायन्ट्स यांच्यात प्रमुख लढत असल्याचं दिसतंय.



दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स (DD) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) आयपीएलमधून बाहेर पडणारे पहिले दोन संघ ठरले आहेत. तर केकेआरची (KKR) परिस्थिती देखील त्याच मार्गावर आहे. केकेआर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 6 टक्के म्हणजेच नगन्य आहे. तर राजस्थान आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ प्लेऑफ खेळण्याची शक्यता 11 टक्के आणि 21 टक्के अनुक्रमे आहे. तसेच आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 31 टक्के आहे.