मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मुंबई टीमला सुरुवातीपासूनच अपयशाचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या धडाकेबाज फलंदाजाची कमतरता जाणवत आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे टीममधून बाहेर आहे. त्याच्या करंगळीला दुखापत झाल्याने तो सध्या खेळू शकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादवच्या फिटनेसवर कर्णधार रोहित शर्माने सर्वात मोठी अपडेट दिली आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माने याबाबत मोठी माहिती दिली आहे. सूर्यकुमार यादव फिट होईन मैदानात कधी परतणार याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. 


'सूर्यकुमार यादव आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो फिट होताच तातडीने टीममध्ये सहभागी होईल. आम्हाला असं वाटतं की तो दुखापतीमधून पूर्ण बरा व्हावा. कारण आता फिट आहे म्हणून तो मैदानात उतरला आणि त्यानंतर पुन्हा दुखापत सुरू झाली तर... आम्ही सध्या कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही', असं यावेळी बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला आहे. 


मुंबई 6 एप्रिल रोजी आपला पुढचा सामना कोलकाता विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळणार की नाही याबाबत रोहितने सध्या कोणतीही माहिती दिली नाही. सूर्यकुमार यादवची कमतरता फलंदाजीमध्ये मधल्याफळीसाठी मुंबई टीमला जाणवत आहे. 


मुंबई टीमने आतापर्यंत दोन सामने गमावले आहेत. आता तिसरा सामना कोलकाता विरुद्ध होणार असून या सामन्यात तरी मुंबईला जिंकण्यात यश मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळणार की नाही याबाबत अजून रोहितने माहिती दिली नाही. चाहते सूर्यकुमार लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.