मान गये गुरु! कॅप्टन जाडेजा थरारक विजयानंतर धोनीसमोर नतमस्तक
धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतर कॅप्टन रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) धोनीसमोर नतमस्तक झाला.
मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज असताना चौकार मारत चेन्नईला (Chennai Super Kings) थरारक विजय मिळून दिला. यासह चेन्नईने मुंबईवर 3 विकेट्सने विजय मिळवला. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 17 धावांची गरज होती. धोनीने चेन्नईला अखेरपर्यंत सामन्यात जिवंत ठेवलं. धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतर कॅप्टन रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) धोनीसमोर नतमस्तक झाला. (mi vs csk ipl 2022 chennai super kings captain ravindra jadeja bow down to mahendra singh dhoni after sensational win against mumbai indians)
विजयानंतर धोनी आणि ड्वेन ब्राव्हो ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाले. याचवेळेस दोन्ही टीमचे सर्व सदस्य हे मैदानात येत एकमेकांशी हस्तांदोलन केलं. या वेळेस कॅप्टन जाडेजाने धोनीला मानाचा मुजरा केला. जाडेजाने धोनीला मुजरा करतानाचा व्हीडिओ आयपीएलने शेअर केलाय. तसेच हा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
असा रंगला शेवटच्या ओव्हरचा थरार
चेन्नईला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची आवश्यकता होती. मैदानात महेंद्रसिंह धोनी आणि प्रिटोरियस ही सेट जोडी होती.
मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने जयदेव उनाडकला निर्णायक ओव्हर टाकायला दिली. स्ट्राईकवर प्रिटोरियस होता. जयदेवने पहिल्याच बॉलवर प्रिटोरियसला एलबीडबल्यू आऊट केलं. प्रिटोरियसनंतर ड्वेन ब्राव्हो मैदानात आला.
चेन्नईला आता 5 बॉलमध्ये 17 धावांची गरज होती. ब्राव्होने दुसऱ्या बॉलवर सिंगल काढत धोनीला स्ट्राईक दिली.आता 4 बॉलमध्ये हव्या 16 धावा, धोनी स्ट्राईकवर होता. धोनीने तिसऱ्या बॉलवर खणखणीत सिक्स हाणला. सामन्याचा थरार अजून वाढला.
मुंबई आणि चेन्नई दोन्ही टीमच्या चाहत्यांच्या ह्रदयाची धडधड वाढू लागली होती. सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. आता चेन्नईला 3 बॉलमध्ये 10 धावा पाहिजे होत्या.धोनीने चौथ्या बॉलवर फोर लगावला.
धोनीच्या या चौकारानंतर चेन्नईच्या ड्रेसिंगरुममध्ये एकच आनंद आणि तितकीच धाकधुक पाहायला मिळाली. तर मुंबईचा कॅप्टन रोहितच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव होते.चेन्नईला 2 बॉलमध्ये 6 धावांची नड होती. धोनीने चलाखीने डीप मिड विकेटच्या गॅपमधून फटका मारला. पहिली धाव पूर्ण केली. त्यानंतर चपळतेने दुसरी धाव मिळवली आणि स्ट्राईकवर आला.
आता 1 बॉलमध्ये 4 धावांची गरज होती. चेन्नईला विजयासाठी चौकार कोणत्याही स्थितीत हवा होता. स्ट्राईकवर अनुभवी आणि दिग्गज धोनी. तर समोर उनाडकट.
सामना कोण जिंकणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं. जयदेव शेवटचा बॉल टाकण्यासाठी धावत आला आणि बॉल टाकला. धोनीने शानदार चौकार मारत चेन्नईला शेवटच्या बॉलवर सनसनाटी विजय मिळवून दिला. यासह धोनाने त्याला 'बेस्ट फिनिशर' का म्हणतात हे पुन्हा सिद्ध करुन दाखवलं.
दरम्यान चेन्नईचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला. तर मुंबईला सलग 7 व्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे मुंबईचं या 15 व्या मेसमातील आव्हान संपुष्टात आलं.