मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना (IPL 2022) आज (21 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 2 यशस्वी संघ या सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. (mi vs csk ipl 2022 mumbai indians vs chennai super kings match preview head to head)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही यशस्वी संघाची या पर्वातील सुरुवात अगदी वाईट झाली आहे. मुंबईला सलग 6 तर चेन्नईला 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.


चेन्नईला 5 सामन्यानंतर 6 व्या मॅचमध्ये पहिला विजय मिळाला. तर मुंबईच्या विजयाची प्रतिक्षा अजून संपलेली नाही. त्यामुळे  मुंबईला हा सामना जिंकून उरल्यासुरल्या अपेक्षा कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. 


तर चेन्नईसाठी 'करो या मरो' असा सामना आहे. दोघांसाठी प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा मुद्दा आहे. 


आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी असलेले दोन्ही संघ या मोसमात अपयशी ठरलेत. यामुळे आता या मोसमात कसे खेळतात आणि कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.


आकडे कोणाच्या बाजूने?


मुंबई-चेन्नई या दोन्ही संघांचा आतापर्यंत एकूण 32 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये मुंबईचा वरचष्मा राहिला आहे. 


मुंबईने चेन्नईवर 19 वेळा विजय मिळवला आहे. तर चेन्नईने मुंबईला 13 सामन्यात पराभूत केलंय.मागील 5 सामन्यांमध्ये मुंबईने 3 तर चेन्नईने 2 मॅचेस जिंकल्या आहेत.


मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), अनमोलप्रीत सिंह, राहुल बुद्धि, रमनदीप सिंह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर, बासिल थम्पी, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टाइमल मिल्स, अर्शद खान, डेनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फैबियन एलन, कीरोन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि ईशान किशन.


चेन्नई सुपर किंग्स : रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, अंबति रायडू, रॉबिन उथप्पा, मिचेल सेंटनर, ख्रिस जॉर्डन, एडम मिल्ने, डेवोन कॉनव्हे, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, महेश तीक्ष्णा, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम आसिफ, सी हरि निशांत, एन जगदीशन, सुभ्रांशु सेनापति, के भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह आणि मुकेश चौधरी.