Rohit Sharma | कॅप्टन रोहितने नाक कापलं, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम
आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 33 वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई (MI vs CSK) यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) झिरोवर म्हणजेच डक आऊट झाला.
मुंबई : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. मात्र यशस्वी कॅप्टन आणि फलंदाजाच्या मागे साडेसाती लागली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यात रोहित झिरोवर म्हणजेच डक आऊट झाला. रोहितला चेन्नईच्या मुकेश चौधरीने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर मिचेल सँटनरच्या हाती कॅच आऊट केलं. (mi vs csk mumbai indians captain rohit sharma set bad record his most 14th time out on duck in ipl history)
यासह रोहितच्या नावावर आयपीएलमधील सर्वात वाईट विक्रम झाला आहे. रोहित आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारा फलंदाज ठरला. रोहितची आयपीएलमध्ये झिरोवर आऊट होण्याची 14 वी वेळ ठरली.
रोहितची ढिसाळ कामगिरी
रोहितला या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितने या मोसमात आतापर्यंत 7 सामन्यात फक्त 114 धावा केल्या आहेत. यामुळे रोहितला झालंय तरी काय, असा संतप्त सवाल क्रिकेट चाहते या निमित्ताने उपस्थित करत आहेत.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, राइली मेरेडिथ, ऋतिक शौकीन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनादकट.
सीएसकेचे अंतिम 11 शिलेदार : रवींद्र जडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी.