मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता झाला. या सामन्यात कोलकाता संघाने चेन्नईला धूळ चारली. चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला आहे. आज हंगामातील दुसरा सामना मुंबई विरुद्ध दिल्ली होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली आणि मुंबईसाठी हा पहिला सामना आहे. दोन्ही संघ आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर भिडणार आहेत. यावेळी मुंबई आपला दरवर्षीचा रेकॉर्ड मोडणार का? हे पाहाणं मुंबईकरांसाठी महत्त्वाचं ठऱणार आहे. आयपीएलचे सामने सुरू झाल्यापासून मुंबई आजवर पहिला सामना कधीच जिंकली नाही. 


मुंबई आपला हा रेकॉर्ड आज मोडणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज रिषभ पंतची टीम मुंबईवर भारी पडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता होणार आहे. हा सामना सुरू होण्याआधी हेड टू हेड रेकॉर्ड काय सांगतात जाणून घेऊया.


मुंबई विरुद्ध दिल्ली संघात काटे की टक्कर असणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 30 सामने खेळले आहेत. मुंबई संघ त्यामधील 16 सामने जिंकला आहे. तर दिल्ली संघ 14 सामने जिंकला आहे. गेल्या हंगामात दोन्ही सामन्यात दिल्ली संघाचा विजय झाला होता. 2020 मध्ये मुंबई इंडियन्स दिल्लीवर भारी पडले होते. 


2020 मध्ये दिल्ली संघाला रोहितच्या टीमने म्हणजेच मुंबईने 4 सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. क्वालिफायर आणि फायनलमध्येही दिल्लीचा पराभव केला होता. यंदा संघ 10 आहेत. त्यामुळे स्पर्धाची चुरशीची आहे. दिल्ली संघाला कसं रोहित शर्मा रोखणार? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे.