मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दुसरा सामना आज दुपारी होत आहे. दिल्ली विरुद्ध मुंबई दुसरा सामना होत आहे. दुपारी 3.30 वाजता ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 30 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. मुंबई संघाने 16 तर दिल्लीने 14 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई संघातून ईशान किशन आणि रोहित शर्मा ओपनिंगसाठी उतरू शकतात. तर सूर्यकुमार यादव संघात परतल्याने आनंदाचं वातावरण आहे. मात्र तो पहिला सामना खेळणार की नाही याबाबत अजूनही शंका आहे. सूर्यकुमारच्या जागी मुंबई संघात तिलक वर्माला डेब्यू करण्याची संधी मिळू शकते. 


दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डिवाल्ड ब्रेविस या सामन्यात खेळताना दिसणार आहे.  बुमराहसोबत जयदेव उनादकट, मयंकला संधी मिळू शकते. नेहमीप्रमाणे मुंबई संघ पहिला सामना पराभूत होणार की जिंकण्यात यश मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दिल्ली संघात डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिख नॉर्खिया, मुस्तफिजुर रहमान आणि लुंगी एनगिडी सारखे दिग्गज खेळाडू संघातून बाहेर आहेत. त्यामुळे चात्यांची थोडीशी निराशा होऊ शकते.  नॉर्खियाला दुखापत झाली आहे. तर एनगिडी आणि मुस्ताफिजुर पहिल्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाहीत. वॉर्नर पहिले 2 तर मार्श पहिले 3 सामने खेळणार नाही. 


दिल्ली संघातून यश ढुलला आयपीएलमध्ये डेब्यू करण्याची संधी दिली जाऊ शकते. टीम सिफर्ट आणि मनदीप सिंहला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. 


मुंबई संघ संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, डेनियन सॅम्स/डेवाल्डे ब्रेविस, टिम डेविड, कीरोन पोलार्ड, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय.


दिल्ली संघ संभाव्य  प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, टिम सीफर्ट, यश ढुल, मंदीप सिंह, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन साकरिया