मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) ज्या खेळाडूचं कौतुक केलं होतं, त्यालाच गुजरात विरुद्धच्या सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवला. रोहितने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (mi vs gt ipl 2022 mumbai indians captain rohit sharma replaces hrithik shokeen with murgan ashwin against to gujrat titans)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितने ऋतिक शौकीनला (Hrithik Shokeen) प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं. तर शौकीनच्या जागी मुरगन अश्विनला (Murgan Ashwin) पुन्हा संधी दिली.


मुंबईने या मोसमातील एकमेव सामना हा राजस्थान विरुद्ध जिंकला. या सामन्यात ऋतिकने शानदार कामगिरी केली होती. ऋतिकने या सामन्यात 3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर कॅप्टन रोहितने ऋतिकचं कौतुक केलं होतं. 


ऋतिकने रोहितला आणि संपूर्ण टीमला आपल्या बॉलिंगने प्रभावित केलं होतं. त्याने आपल्या गोलंदाजीची छाप सोडली होती. त्यामुळे ऋतिकला गुजरात विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवलं जाईल, अशी आशा होती. मात्र रोहितने दुसराच निर्णय घेतला.


मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, कायरन पोलार्ड, डेनियल सैम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.


गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप सांगवन, लॉकी फर्ग्यूसन, अल्जारी जोसेफ आणि मोहम्मद शमी.