मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात खूपच रंजक झाली. यावेळी कोलकाता, पंजाब, राजस्थान टीमने खूप उत्तम कामगिरी केली. तर मुंबई इंडियन्स, दिल्ली, चेन्नई टीमना फार यश मिळवता आलं नाही. लखनऊ आणि गुजरात दोन नव्या टीम आल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा अधिक चुरशीचा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता विरुद्ध मुंबई आज सामना आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. मुंबई टीम गेल्या 2 सामन्यात फार चांगली कामगिरी करताना दिसला नाही. पण कोलकाता टीमने उत्तम कामगिरी केली. कोलकाता टीमचा हा चौथा सामना असणार आहे. कोलकाताने दोन जिंकले तर एक सामना गमवला आहे. 


कोलकाता विरुद्ध मुंबई आतापर्यंत 29 वेळा आमनेसामने आले आहेत. मुंबईने 27 सामने जिंकले तर कोलकाताने 7 सामने जिंकले आहेत. आजचा सामना कोण जिंकणार याकडे आता लक्ष आहे. 


कोलकाता टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार) सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरेन, टिम साउथी, उमेश यादव, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती.


मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, कीरोन पोलार्ड, टिम डेव्हिड, डेनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टाइमल मिल्स, जसप्रीत बुमराह आणि बासिल थम्पी.