मुंबई : मुंबई विरुद्ध लखनऊने दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा हा सलग सहावा पराभव आहे. मुंबई टीमल एकही सामना जिंकण्यात यश आलं नाही. लखनऊने 199 धावा केल्या आणि मुंबईला 181 धावा करण्यात यश आलं. मुंबईचा 18 धावांनी पराभव झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

के एल राहुलसाठी हा सामना खास होता. सामना जिंकला आणि शतकही झळकवलं मात्र त्याचा आनंद साजरा करण्याआधीच संकट ओढवलं. सामना संपल्यानंतर कॅप्टन के एल राहुलला लाखो रुपयांचा दंड भरावा लागला आहे. 


लखनऊ टीमला स्लो ओव्हर रेटसाठी दंड भरावा लागला. लखनऊ स्लो ओव्हर रेटसाठी दंड भरणारा पहिली टीम नाही. याआधी मुंबई टीमला 2 वेळा दंड आकारण्यात आला आहे. कॅप्टन के एल राहुलला 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे.


आयपीएलमध्ये राहुलचं तिसरं शतक


के एल राहुलने 60 बॉलमध्ये 9 चौकार आणि 5 षटकार ठोकले. राहुल 103 धावा करून नाबाद राहिला. के एल राहुलचं हे आयपीएलच्या इतिहासातील तिसरं शतक आहे.