मुंबई : प्लेऑफच्या स्पर्धेतून मुंबई टीम बाहेर पडण्याची शक्यता असलेल्या मुंबई टीमला आता प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. मुंबईचा उद्या गुजरात विरुद्ध सामना आहे. हार्दिक पांड्याची टीम तसं पाहता आतापर्यंत 6 पैकी 5 सामने जिंकली आहे. त्यामुळे आता आपला पुढचा सामना जिंकण्यासाठी तयार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्माला पराभवाची साखळी तोडण्यासाठी टीममध्ये काही अत्यावश्यक बदल करावे लागणार आहेत. सूर्यकुमार यादव सोडला तर कोणालाच सर्वात जास्त धावा करण्यात यश मिळालं नाही. ईशान आणि रोहित सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत. 


बुमराहला देखील हवं तेवढं यश मिळत नाही. कुठे गणित चुकतंय याचा ताळमेळ लागत नसल्याने सध्या मुंबई टीमला सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. आता मुंबईला हीच शेवटची संधी असणार आहे. हा सामना हातून गेला तर प्लेऑफमधून बाहेर जाणं निश्चित आहे. 


मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन : किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, टिम डेविड, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, बासिल थम्पी


लखनऊ टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, अवेश खान, दुष्मंथा चमीरा, रवि बिश्नोई