मुंबई : आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी मिळवलेली टीम मुंबईसाठी यंदाचा हंगामात विशेष चांगला असल्याचं दिसत नाही. मुंबई टीमने पंधराव्या हंगामातील 5 पैकी 5 ही सामने गमवले आहेत. आता आज होणाऱ्या सामन्यात तरी जिंकण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई टीम आज पराभवाचा षटकार ठोकणार की विजय मिळवून खातं उघडणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई आजचा सामना जिंकण्यासाठी टीममध्ये काही बदल करणार आहे. 


अशी असेल ओपनिंग जोडी 


रोहित शर्माने आपल्या जीवावर मुंबईला मॅच जिंकवून दिल्या आहेत. 2022 मध्ये मात्र तोच फॉर्ममध्ये दिसत नाही. 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमचे ग्रह फिरल्याचे दिसत आहे. ईशान किशनच्या बॅटमधूनही धावा निघत नाहीत. 


लखनऊ विरुद्धच्या सामन्यात रोहित आणि ईशान ओपनिंग करू शकतात. तिसऱ्या क्रमांकावर डेवाल्ड ब्रेविस उतरण्याची शक्यता आहे. मि़डल ऑर्डरवर टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव उतरण्याची शक्यता आहे. सहाव्या स्थानावर किरोन पोलार्ड मैदानात येईल. 


बुमराह, जयदेव लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरतील. बासिल थम्पीला टीममधून बाहेर बसवलं जाऊ शकतं. त्याच्याजागी फेबियन एलेनला खेळण्याची संधी मिळू शकते.  मुरुगन अश्निन आणि टाइमल्स मिल्सलाही टीममध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. 


मुंबई टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, टाइमल्स मिल्स, फेबियन एलेन.