मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन गेल्या काही दिवसांपासून भारतीय कर्णधार विराट कोहलीवर निशाणे साधत आहे. इंग्लंड दौऱ्यावेळी विराटचे रिव्ह्यू २ वेळा चुकले तेव्हा विराट जगातला सगळ्यात खराब रिव्ह्यू घेणारा खेळाडू आहे, अशी टीका मायकल वॉननं केली होती. विराट जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहे, पण तो सगळ्यात खराब रिव्ह्यू घेणाराही आहे, असं मायकल वॉन म्हणाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा मायकल वॉननं विराटवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पण ही टीका मायकल वॉनच्या चांगलीच अंगाशी आली. २९ ऑक्टोबरला मायकल वॉनचा वाढदिवस होता. त्यावेळी वॉननं बकरीसोबतचा एक फोटो शेअर केला. या बकरीचं नाव विराट असल्याचं वॉन या पोस्टमध्ये म्हणाला. मायकल वॉनच्या या पोस्टनंतर विराटचे चाहते चांगलेच नाराज झाले, आणि त्यांनी मायकल वॉनला ट्रोल करायला सुरुवात केलं.





कोहलीच्या नावावर सर्वाधिक शतकं-रन


यावर्षी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं वनडेमध्ये सर्वाधिक रन आणि शतकं केली आहेत. विराटनं १३ मॅचमध्ये ११६९ रन केले आहेत. यामध्ये ६ शतकांचा समावेश आहे.