मुंबई : दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑल राऊंडर आणि आयसीसीचे मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे. २००८ साली सिडनीत झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया टेस्टवेळी सचिननं घेतलेल्या भूमिकेवरून प्रॉक्टर यांनी ही टीका केलीये. २००८ साली झालेल्या या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर ऍन्ड्र्यू सायमंड्सनं हरभजनला शिवीगाळ केली होती. याला प्रत्युत्तर देताना हरभजननं सायमंड्सला मंकी म्हणल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रकारानंतर हरभजन सिंगवर तीन मॅचची बंदी घालण्यात आली होती. हरभजननं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. या मॅचवेळी रेफ्री माईक प्रॉक्टर होते. माईक प्रॉक्टर यांनी त्यांचं आत्मचरित्र 'कॉट इन द मिडल'मध्ये या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.


सिडनी टेस्टमध्ये सचिननं घेतलेल्या भूमिकेमुळे मी निराश झालो होतो. हरभजननं सायमंड्सला आईवरून केलेली शिवीगाळ सचिननं ऐकली होती. सुनावणीदरम्यान सचिचनं याबद्दल सांगितलं असतं तर प्रकरणाला वेगळं वळण लागलं असतं असं प्रॉक्टर म्हणाले.


सचिचनं त्यावेळी भूमिका घेतली असती तर संशयाची स्थिती संपली असती आणि वर्णद्वेषी टिप्पणी करण्याच्या आरोपांमधून हरभजनची मुक्तता झाली असती, अशी प्रतिक्रिया प्रॉक्टर यांनी दिली.


प्रॉक्टर यांच्या पुस्तकात मंकी गेट नावाचा चॅप्टर आहे. 'मंकी' आणि 'मां की' या दोन्ही शब्दांमध्ये गोंधळ झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला. तेंडुलकर सुरुवातीच्या सुनावणीला आला नाही, त्यामुळे माझ्यापुढे कोणताही पर्याय नव्हता, असं प्रॉक्टर पुस्तकात म्हणाले.