मुंबई: मिल्खासिंग यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खासिंग हे एक जगातील असं व्यक्तीमत्त्व होतं जे आजही प्रत्येकाला माहिती आहे. त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा देखील आला होता. मिल्खासिंग यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोम ऑलिम्पिकमध्ये मेडल जरी हुकलं असलं तरी त्यांची कामगिरी आजही जगभरात प्रसिद्ध आहे. एशियन गेम्समध्ये मिल्खासिंग यांनी अनेक दिग्गज खेळाडूंना मात देऊन मेडल मिळवलं होतं. मिल्खासिंग हे आपल्या करियरमध्ये केवळ 3 शर्यती हरले. 80 पैकी 77 शर्यती त्यांनी जिंकल्या. महान धावपटू असलेले मिल्खासिंग हे कोरोनाच्या शर्यतीतही थोडे कमी पडले आणि त्यांचं कोरोनातून बरे झाल्यानंतर निधन झालं. 



मिल्खा सिंग हे आजही त्यांच्या यशस्वी कारकीर्दीसाठी ओळखले जातात. रोम ओलिम्पिकमध्ये सहभागी होण्याआधी त्यांनी जवळपास 80 शर्यतींमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी केवळ 3 शर्यतींमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर जर कोणी जिंकू शकेल तर ते म्हणजे मिल्खासिंग अशी प्रत्येक भारतीयला त्यावेळी आशा होती. 


कोलकाता येथे 1962 मध्ये झालेल्या नेशनल गेम्समध्ये मिल्खासिंग यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. 6 वर्षांच्या कारकिर्दीत माखनने 12 सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्यपदके जिंकली. मिल्खा सिंग यांनीही एका मुलाखतीत कबूल केले होते की, 'मला रेसमधील कोणाला भीती वाटत असेल तर ते माखन सिंग होते. ते एक उत्कृष्ट धावपटू होते. 1962 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपासून मी 400 मीटर इतकी शर्यत पाहिली नाही. मी माखनला पाकिस्तानच्या अब्दुल खलीकपेक्षा वरचढ आहे असं मला वाटतं, असं मिल्खासिंग त्यावेळी म्हणाले होते.'


रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खासिंग एका छोट्याशा चुकीमुळे मेडलपासून दूर राहिले. त्यानंतर जकार्ता इथे झालेल्या 1662च्या एशियन गेम्समध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलं. आपल्या संपूर्ण करियरमध्ये केवळ 3 शर्यती ते हरले. 77 शर्यतींमध्ये त्यांना मोठं यश मिळालं. एक महान धावपटू म्हणून ते कायमच प्रत्येकाच्या मनात आहेत.