नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान फलंदाज डेव्हिड मिलरने बांगलादेशविरुद्ध केवळ 35 चेंडूत शतक झळकावले आणि टी -20 क्रिकेटमधील वेगवान शतकांचा विक्रम नोंदवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिलरने 36 चेंडूत सात चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 101 धावा केल्या. एक वेळ अशी होती की जेव्हा भारतीय संघाच्या स्टार फलंदाज युवराजसिंगचा सहा षटकारांचा विक्रम तुटतो की काय असं वाटत होतं. पण असं झालं नाही. मोहम्मद सैफुद्दीनच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स मारल्यानंतर शेवटच्या बॉलिवर त्याला फक्त एक रन काढता आला.


सर्वात जलद शतकांमध्ये टी-20 सामन्यांमध्ये हा तिसरा जलद शतक आहे. 2013 मध्ये आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना ख्रिस गेलने 30 चेंडूत शतक झळकवले तर ऍन्ड्र्यू सायमन्ड्सने 2004 मध्ये केंटसाठी 34 चेंडूंत शतक पूर्ण केले होते.


आयपीएलमध्ये मिलरने 38 चेंडूंत शतक झळकावले. क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात 40 चेंडूपेक्षा कमी बॉलमध्ये २ वेळा शतक पूर्ण करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज आहे.