मुंबई : आजपासून पुन्हा एकदा IPL 2021चा थरार पहायला मिळणार आहे. युएईमध्ये पुन्हा सामने सुरु होणार असून पहिला सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा रंगणार आहे. तर या सामन्यासाठी मुंबईने आपल्या ताफ्यात एका खास खेळाडूचा समावेश केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) जखमी मोहसीन खानच्या जागी वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू रौश कलारियाचा समावेश केला आहे. कलारिया मुंबई इंडियन्स संघासोबत 'बॅक-अप' खेळाडू म्हणून अबू धाबीला गेला होता. 


कलारिया अंडर-19 टीमचा भाग होता


2012 च्या आयसीसी अंडर -19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये कलारिया भारतीय अंडर-19 संघाचा भाग होता. 2012 मध्ये पदार्पण केल्यापासून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातचा प्रमुख खेळाडू आहे. शनिवारी प्रशिक्षण सत्रादरम्यान कलारियाचा संघात समावेश करण्यात आलं होतं.


15 ऑक्टोबर रोजी होणार फायनल


आयपीएल 2021चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाईल, तर पहिला क्वालिफायर 10 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. याशिवाय  एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर अनुक्रमे 11 आणि 13 ऑक्टोबर रोजी शारजामध्ये खेळला जाईल. 


प्वॉईंट्स टेबलमध्ये कोण आघाडीवर?


आयपीएल 2021 च्या पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे 10 गुण असून 7 पैकी 5 सामने जिंकलेत.