नवी दिल्ली :  टीम इंडियाचा जलद गती गोलंदाज आशीष नेहराने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आशीषच्या फिटनेससमोर त्याच्या वयाने गुडघे टेकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी-२० सिरीजमध्ये नेहराने पुनरागमन केल्यानंतर मिशेल जॉन्सन आणि आणि डीन जॉन्स यांनी त्याची खिल्ली उडवली. पण असे केल्यावर जॉन्सनला सोशल मीडियावर भारतीय फॅन्सने ट्रोल करण्यास सुरूवात केली. 


ही मस्करीची सुरूवात मिशेल जॉन्सन आणि न्यूझीलंडचा गोलंदाज मिशेल मॅक्लेघन यांच्या ट्विटनंतर झाली. हे दोन्ही गोलंदाज मस्करीत एक दुसऱ्याला ट्रोल करत होते.  जॉन्सनने मॅक्लेघनला आव्हान देत म्हटले तो वयाच्या ३० व्या वर्षी जगातील सर्वात जलद गती गोलंदाज बनलो होता. यात ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डीन जॉन्स याने हस्तक्षेप केला. 


 



 
त्याने ट्रोल केले की, सध्या सर्वात जलद गती गोलंदाज डाव्या हाताचा आशीष नेहरा आहे. त्यानंतर नेहराला सर्वांनी टार्गेट केले. जॉन्सन म्हटला की त्याचा रन अप खूप चांगला आहे. 


 




ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने नेहराची खिल्ली उडविल्यावर भारतीय समर्थक यांनी दोघांवर हल्लाबोल केला. एक म्हटला की ३८ वर्षांच्या नेहराचा रन अप नाही तर लाइन आणि लेन्थ चांगली आहे. त्यानंतर जॉन्सनने काही डाटा ट्रोल केला. पण हे सर्व मस्करीत सुरू होते.