मिचेल स्टार्कचा रेकॉर्ड, एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक घ्यायचा पराक्रम केला आहे.
पर्थ : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक घ्यायचा पराक्रम केला आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये स्टार्कनं तीन यॉर्कर टाकून हॅट्रिक घेतली. पहिल्या इनिंगमधल्या हॅट्रिकमध्ये स्टार्कनं जेसन बेहरनड्रॉफ, डेव्हिड मुडी आणि सिमन मॅकीन यांच्या विकेट घेतल्या.
तर दुसऱ्या इनिंगमध्येही पुन्हा हॅट्रिक घेऊन स्टार्कनं न्यू साऊथ वेल्सचा विजय सोपा केला. ऑस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक घेणारा मिचेल स्टार्क हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक ८ वेळा घेण्यात आल्या आहेत.
मिचेल स्टार्कनं या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ४ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३ विकेट घेतल्या. अॅशेस सीरिज सुरु व्हायला १७ दिवस बाकी असतानाच स्टार्कनं ही कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंडचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
पाहा स्टार्कची धडाकेबाज बॉलिंग