डर्बी : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने तडाखेबंद शतक झळकावलेय. तिने ११६ चेंडूत हे शतक साकारले. वनडेतील तिचे हे सहावे शतक आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्यासोबतच वेदा कृष्णामूर्तीनेही ३४ चेंडूत अर्धशतक झळकावण्याची किमया साधली. या दोघांच्या दमदार खेळीमुळे भारताने अडीचशे धावांचा टप्पा पार केलाय.


पहिले दोन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मिताली राजने हरमनप्रीत कौरसह चांगली भागीदारी केली आणि संघाच्या धावसंख्येला स्थैर्य मिळवून दिले. कौर बाद झाल्यानंतर मितालीने वेदासह धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केलीय