लॉर्ड्स : नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेटसाठी लॉर्ड्सचं मैदान नेहमी फायदेशीर ठरलं आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमच्या नजरा इंग्लंड विरोधात खेळतांना वर्ल्डकप फायनल जिंकत पहिल्यांदा विश्व चॅम्पियन बनण्याची आणि वर्ल्डकपवर असेल. 25 जून 1932 ला टीम इंडियाने याच ऐतिहासिक मैदानावर क्रिकेट वारी सुरु केली होती. त्यानंतर 51 वर्षानंतर 25 जून 1983 ला भारताने याच मैदानावर वर्ल्डकप जिंकला होता.


भारतीय क्रिकेटमध्ये आता एक नवा अध्याय सुरु होत आहे. मैदान लॉर्ड्सचच आहे. 23 जुलैला आज 3 वाजता सामना सुरु होणार आहे. आणि टीम इंडिया जिंकण्यासाठी सज्ज आहे.