नवी दिल्ली : यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने फायनलपर्यंत नेणारी कर्णधार मिताली राजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीबीसीने २०१७ तील सर्वात प्रभावशाली १०० महिलांची यादी जाहीर केली असून यात मिताली राज हिलाही स्थान देण्यात आलंय. 


२०१७ मधील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत मितालीसोबतच एम्बाइब कंपनीच्या सीईओ अदिती अवस्थी, लेखिका इरा त्रिवेदी आणि गेल्या आठ वर्षांपासून तिहार तुरुंगात मुलांना शिक्षण देणा-या शिक्षिका तुलिका किरण यांच्यासारख्याची आणखी काही महिलांची नावे आहेत. बीबीसीच्या या प्रभावशाली महिलांच्या यादीत अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीची आई महरून्निसा सिद्दीकी यांनाही निवडण्यात आलंय. 


या यादीत इंजिनिअरपासून ते इंडस्ट्री, खेळ ते व्यवसाय सर्वच क्षेत्रातील महिलांना सामिल केलं जातं. या महिलांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांचा सन्मान केला जातो.