अभिमानास्पद! मितालीनं रचला इतिहास, ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटर
मिताली राजनं आंतरराष्ट्रीय स्तरावर धावांचा विक्रम केला आहे. तिच्या या विक्रमाचं कौतुक होत आहे.
मुंबई: भारताची महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज मिताली राजनं इतिहास रचला आहे. मितालीच्या या कामगिरीचं प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. भारताच्या शिरपेचात मितालीनं मानाचा आणखीन एक तुरा रोवला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे. 38 वर्षीय मितीलाच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर जगभरात मितालीचा दुसरा क्रमांक आहे. तिने साऊथ आफ्रीके विरुद्ध वन डे सीरिजमधील तिसऱ्या सामन्यात हा इतिहास रचला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तिच्या या कामगिरीबद्दल खूप कौतुक केलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील ती एक महान क्रिकेटपटू असल्याचंही यावेळी सांगायला विसले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज मिताली ठरल्यानं तिचं अभिनंदन केलं आहे.