नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राजने आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करताना नवा इतिहास रचला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ ऑगस्ट २००२मध्ये मिथाली राजने इंग्लंडविरुद्धच्या टॉन्टन येथील सामन्यात २१४ धावांची खेळी केली होती. मिथालीच्या कसोटी क्रिकेटमधील या सर्वाधिक धावा आहेत. मिथालीने हा रेकॉर्ड केला होता, तेव्हा ती केवळ १९ वर्षांची होती. 


मिथालीच्या जबरदस्त खेळीमुळे भारताला इंग्लंडविरुद्धचा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाले होते. भारताने टॉस जिंकताना सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या होत्या. 


प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात डळमळीत झाली. मिथाली चौथ्या स्थानावर खेळण्यास आली. मिथालीने कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकले आणि कसोटीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. मिथालीने ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रॉल्टन(नाबाद२०९) मागे टाकले.