मुंबई : महिलांचा आयसीसी टी-२० वर्ल्ड कप सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरु आहे. आयर्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये मितालीनं लागोपाठ दुसरं अर्धशतक केलं. यामुळे भारताचा ५२ रननी विजय झाला. या विजयामुळे भारतानं वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत तिसऱ्यांदा पोहोचला आहे. आयर्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये मितालीनं ५६ बॉलमध्ये ५१ रनची खेळी केली.


मितालीनं रोहित शर्माला मागे टाकलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मितालीनं ४७ बॉलमध्ये ५६ रन केले. या खेळीदरम्यान मितालीनं रोहित शर्माला मागे टाकलं. मिताली राज ही आता भारताची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली सर्वाधिक रन करणारी खेळाडू आहे. मितालीच्या नावावर २,२८३ रन आहेत. रोहितनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २,२०७ आणि विराटनं २,१०२ रन केल्या आहेत.


मितालीनं आत्तापर्यंत ८० आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळल्या. तर रोहितनं ८० आणि विराटनं ५८ मॅच खेळल्या आहेत. मिताली ही भारताची माजी कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मिताली राजनं १७ अर्धशतकं केली आहेत.


मिताली राज महिलांमध्ये तिसरी


टी-२०मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये मिताली राज चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या सुझी बेट्सनं २९९६ रन, वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरनं २७३२ रन आणि इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्सनं २६०५ रन केले आहेत.


पुरुष महिलांच्या मागे


टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पुरुष अजूनही महिलांच्या मागेच आहेत. पुरुषांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील २२७१ रनसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा २,२०७ रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.