नवी दिल्ली : वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने इतिहास बनवला आहे. मोईन अलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करत केवळ 53 चेंडूत शतक झळकावले आहे. अली इंग्लंडकडून वेगवान शतक ठोकण्याच्या यादीत दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडकडून सर्वात वेगवान शतक जॉस बटलरने झळकावले आहे. त्याने 46 चेंडूत शतक झळकावले होते. इंग्लंडकडून ४ पैकी ३ वेगवान शतक बटलरनेच झळकावले आहे. बटलरने 2015 मध्ये 46 चेंडूत पाकिस्तान विरोधात शतक झळकवले होते.


अलीने आपल्या एकदिवसीय सामन्य़ांच्या करिअरमध्ये तिसरं शतक झळकावून इतिहास घडवला आहे. अलीच्या या इंनिगची खासियत म्हणजे त्याने पहिल्या 39 चेंडूत फक्त 39 धावा केल्या होत्या. यामध्ये अलीने फक्त पाच चौकार ठोकले होते.  अलीने केवळ 14 चेंडूत 61 धावा केल्या. यादरम्यान अलीने दोन चौकार व आठ षटकार मारले आहेत. अलीने 57 बॉलमध्ये 102 रन्सची खेळी केली.