Pakistan national Cricket team : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तान क्रिकेट संघाने तयारी सुरू केली आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेलं वादळ आता शांत झाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम (Babar Azam) याच्या खांद्यावर पुन्हा संघाची जबाबदारी दिल्यानंतर आता मोठे बदल होत असल्याचं पहायला मिळतंय. येत्या 18 एप्रिलपासून पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्घ टी-ट्वेंटी मालिका (PAK vs NZ T20I) खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वाच्या अशा मालिकेसाठी पाकिस्तानने मोठी खेळी खेळली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघात फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आलेल्या मोहम्मद आमीरला (Mohammad Ami) पुन्हा संधी देण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाची नुकतीच घोषणा झाली. त्यावेळी पाकिस्तानमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवड समिती बरखास्त केल्यानंतर मोठे बदल झाल्याचं दिसतंय. ज्या  इमाद वसिम (Imad Wasim) आणि मोहम्मद आमिर यांनी बाबर आझमवर टीका केली होती. त्याच बाबरच्या नेतृत्वात आता इमाद वसिम आणि मोहम्मद आमिर खेळताना दिसणार आहे. इमाद वसिम आणि मोहम्मद आमिर यांची न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता बाबर आझमच्या डोक्यात नेमका कोणता प्लॅन शिजतोय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.



पाकिस्तानचा संघ -


बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर झमान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद  रिझवान, मोहम्मद आमिर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उसामा मीर, उस्मान खान, झमान खान, हसीबुल्लाह, मोहम्मद वसीम ज्युनिअर, शाहिबजादा फरहान आणि सलमान अली अघा.


न्यूझीलंडचा संघ - 


मायकेल ब्रेसव्हेल (कर्णधार), फिन अलेन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जॅकोब डफी, डिन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, टीम रॉबिन्सन, बेन सर्स, टीम सेफर्ट, इश सोधी, कोल मॅककॉन्ची, विल ओ'रुर्के.


PAK vs NZ टी-ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक 


18 एप्रिल - पहिला टी-ट्वेंटी सामना - रावळपिंडी
२० एप्रिल - दुसरा टी-ट्वेंटी सामना - रावळपिंडी
२१ एप्रिल - तिसरा टी-ट्वेंटी सामना - रावळपिंडी
२५ एप्रिल - चौथा टी-ट्वेंटी सामना - लाहोर 
२७ एप्रिल - पाचवा टी-ट्वेंटी सामना - लाहोर