मुंबई :  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा मदर ऑफ ऑल बॅटल म्हटले जाते.  त्या संदर्भात कोणतीही चर्चा ही मोठी बातमी होती.  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये विराट कोहलीला बाद केल्यानंतर आज पहिल्यांदा पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरकडून पहिल्यांदा विराटबद्दल विधान आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमीरला त्याच्या ट्विटर अकाउंटला एका चाहत्याने विचारलं की, जगातील कोणता सर्वोत्तम फलंदाज आहे.


शब्दात सांगायचे झाले तर, अमीरने जास्त वेळ न घेता ‘कोहली’ असं म्हटले.


अमीरच्या या प्रामाणिक उत्तराने काहींनी त्याचं कौतुक केलं तर काहींनी नाराजी व्यक्त केली.


कोहली देखील अमीरचा मोठा चाहता आहे. ५ वर्षांच्या निलंबनानंतर परतफेड म्हणून त्याला बॅट भेट दिली.


‘‘मला नेहमीच असा विश्वास होता की, ‘अमीर’ जगातील दर्जेदार बॉलर आहे. ५ वर्षांपूर्वी अमीरला खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. 


तो जगातील अव्वल तिसरा गोलंदाज ठरला. अमीरकडे भरपूर टॅलेन्ट, वेगवान तसेच तो चांगला यॉकर आहे.’’ २०१६ च्या आशिया कप स्पर्धेदरम्यान कोहलीने अमीरबद्दल सांगितले.