World Cup 2023 : `विराट कोहली स्वार्थी, तो शतकांसाठीच खेळतो`, पाकिस्तानच्या माजी कॅप्टनने ओकली गरळ!
Virat kohli Century : विराट कोहलीच्या फलंदाजीत मला स्वार्थाची भावना दिसली आणि या विश्वचषकात हे तिसऱ्यांदा घडलं. 49 व्या षटकात, तो स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी सिंगल घेण्याचा विचार करत होता, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez ) याने केलंय.
Mohammad Hafeez On Virat kohli : विराट कोहलीने साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वनडे क्रिकेटमधील ४९ वं शतक झळकावलं. कोहलीने (Virat kohli) हे शतक करताना सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. कोहलीच्या या कामगिरी जगभरात चर्चा होतीये. मात्र, पाकिस्तानच्या काही खेळाडू तोंडाच्या वाफा सोडताना दिसत आहेत. साऊथ अफ्रिकेविरुद्ध विराट कोहली स्लो खेळल्याने त्याच्यावर टीका होत होती. विराट कोहली शतकासाठी खेळला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, या सामन्यात कोणत्याही खेळाडूला पिचमुळे मोठी फटकेबाजी करता आली नव्हती. टीम इंडियाने सामना दिमाखात जिंकला. मात्र, पाकड्यांची वायफळ बडबड काही थांबत नसल्याचं दिसतंय.
वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीची दोन शतके हुकली होती. साऊथ अफ्रिकेच्या सामन्यापूर्वी कोहली 95 आणि 88 धावांवर बाद झाला होता. मात्र, शतकाच्या जवळ आल्यानंतर विराट एकेरी दुहेरी धावांवर भर देताना दिसला. त्यावरून पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीवरून टीकेचं सत्र सुरू असल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez ) याने देखील पुन्हा गरळ ओकली आहे.
काय म्हणाला Mohammad Hafeez ?
विराट कोहलीच्या फलंदाजीत मला स्वार्थाची भावना दिसली आणि या विश्वचषकात हे तिसऱ्यांदा घडलं. 49 व्या षटकात, तो स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी सिंगल घेण्याचा विचार करत होता आणि त्याने संघाला प्रथम स्थान दिले नाही. रोहित शर्माही स्वार्थी क्रिकेट खेळू शकला असता, पण तो खेळला नाही कारण तो टीम इंडियासाठी खेळत आहे, स्वत:साठी नाही, असं पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज याने म्हटलं आहे.
शमीचं जोरदार प्रत्युत्तर
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू हसन राजाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ABN News वरील चर्चेत बोलताना हसन राजा याने भारतीय गोलंदाजांना दुसरा चेंडू दिला जात असावा, अशी शक्यता व्यक्त करताना आयसीसीने चौकशी कऱण्याची मागणी केली होती. त्यावर आता भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने प्रतिक्रिया दिली आहे. "काहीतरी लाज बाळगा यार, तुम्ही इतर बकवास गोष्टींपेक्षा खेळावर लक्ष केंद्रीत करा. दुसऱ्याच्या यशाचा कधीतरी आनंद घ्या. छी य़ार..ही आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा आहे, तुमची स्थानिक स्पर्धा नाही. तुम्ही नक्की खेळाडूच होता ना..", असं शमी म्हणाला आहे.