`नक्कीच चूक झाली, मी खेळपट्टीचा रंग बदलताना पाहिलाय...`, वर्ल्ड कप फायनलवर मोहम्मद कैफ धक्कादायक खुलासा!
Mohammed kaif on WC 2023 : वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टिम इंडियाचा ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने पराभव करुन वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरल. टिम इंडियाचा वर्ल्डकप फायनला पराभव भारतीय चाहते अजूनही विसरले नाहीत. त्यातच टिम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने वर्ल्ड कप फायनल बाबत मोठा दावा केला आहे.
2023 ODI World Cup final News In Marathi : गेल्यावर्षी आयसीसी वन डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. टिम इंडियाच्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 43 व्या ओव्हरमध्ये सामना जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं आहे. हा सामान क्रिकेट प्रेमी अजूनही विसरले नाहीत. त्यातच टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मज कैफ याने मोठा दावा केला असून फायनलमधील पराभवास कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जबाबदार धरले आहे. नेमका काय म्हणला मोहम्मज कैफ जाणून घ्या...
भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने 2023 च्या वर्ल्डकपच्या फायनलसाठी निवडण्यात आलेल्या खेळपट्टी संदर्भात मोठा दावा केला असून, 'द लॅलनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, मी तिथे तीन दिवस होतो, आणि तिथून मी अनेक लाईव्ह शो केलेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सायंकाळच्या वेळी तिथे आले, खेळपट्टीवर फिरले, अंदाज घेतला. दोघांमध्ये या संदर्भात चर्चाही झाली. ते अर्धा-एक तास फिरत होते. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी तेच केले. सलद तीन दिवस खेळपट्टीवर येऊन खेळपट्टीचा अंदाज घेतला. मी खेळपट्टीचा रंग बदलताना पाहिलं आहे.
पुढे तो म्हणाला की, खेळपट्टीव गवत कमी होते आणि पाणीही कमी मारले जात होते. घरच्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी दोघांनी खेळपट्टी संथ केली आणि डाव आपल्यावरच उलटा पडला. जर तुम्ही वारंवार खेळपट्टी पाहत असाल तर तुम्हाला बदल कळायला हवा होता आणि तुम्ही क्यूरेटशी संवाग साधायला हवा होता.
दरम्यान आयसीसी इव्हेंटमधील खेळपट्ट्या प्रशासकीय मंडळाचे सल्लागार अँडी अॅटकिन्सन यांच्या देखरेखीखाली तयार केल्या जातात. ते प्रत्येक सामन्यासाठी मैदानावर जातात आणि कोणत्या खेळपट्टीवर सामना खेळला जाईल याविषयी स्थानिक देशाच्या बोर्डाशी आधीच सल्लामसलत करून सहमती दर्शवतात. ICC निश्चितपणे अपेक्षा करते की नॉकआऊट सामन्यांचे आयोजन करण्यासाठी ज्या मैदानांना नियुक्त केले आहे, ते त्या सामन्यासाठी सर्वोत्तम खेळपट्टी आणि आउटफिल्ड प्रदान करतील.
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी
2014- T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पराभव
2015- क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत पराभव
2016- T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव
2017- चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पराभव
2019- क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत पराभव
2021- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल हरली
2021- T20 विश्वचषक स्पर्धेत गट टप्प्यातून बाहेर
2022- T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव
2023- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल हरले
2023- क्रिकेट विश्वचषक अंतिम फेरीत पराभव