PAK vs AFG : LIVE सामन्यात मोहम्मद नबीची बाबर आझमला तंबी! पाहा नेमकं काय झालं?
PAK vs AFG Viral Video : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) बाबर आझमला (Babar Azam) तंबी दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये नेमकं काय झालं?
Mohammad Nabi Warns Babar Azam : वनडे वर्ल्ड कपमधील 22 व्या सामन्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (PAK vs AFG) संघ आमनेसामने आले आहेत. चेन्नई चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने सुरुवातीला घातक गोलंदाजी करत पाकिस्तानवर दबाव आणला होता. मात्र, अखेर इफ्तिखार अहमद (Saud Shakeel) आमि शादाब खान (Shadab Khan) यांनी जोरदार फटकेबाजी करत पाकिस्तानला 282 अशी मोठी धावसंख्या उभारून दिली. वर्ल्ड कपमध्ये थंड असेल्या बाबरने (Babar Azam) आज चांगली खेळी केली अन् 74 धावा चोपल्या. मात्र, याच सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने बाबर आझमला तंबी दिली होती. सामन्यात नेमकं काय झालं होतं? पाहुया...
पाकिस्तानचा सलामीवीर उमाम उल हक लवकर बाद झाल्यानंतर बाबर आझमने तिसरा नंबर पकडला अन् संघाला सावरण्यासाठी जबाबदारी खांद्यावर घेतली. मात्र, अफगाणी फिरकीपुढे पाकिस्तानचा संकटाचा सामना करावा लागला. 15 व्या ओव्हरपर्यंत स्पिनर मोहम्मद नबीने 4 ओव्हर पूर्ण केल्या होत्या. त्याचवेळी कॅप्टनने 16 वी ओव्हर नबीला सोपवली. बाबरला आऊट करणं गरजेचं होतं. 16 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवेळी बाबर नॉन स्टाईक एन्डवर होता. बाबर क्रिझच्या पुढे येत असल्याचं पाहून मोहम्मद नबीने बॉल टाकण्यापूर्वी बाबर आझमला क्रीज सोडण्याबद्दल चेतावणी दिली.
मोहम्मद नबीला बॉल टाकताना थांबताना पाहून बाबरने सावध भूमिका घेतली अन् बॅट पुन्हा मागं घेतली आणि आपली मंकडिंग वाचवली. मात्र, नबीने मंकडिंगचा प्रयत्न केला नाही. नबीने फक्त बाबरला वॉर्निंग दिली. त्यावेळी बाबरने देखील बॅट क्रिझच्या आत घेत इशारा कबुल केला.
पाहा Video
पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघासाठी सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार बाबर आझम यांनी अर्धशतके झळकावली. तर पहिलाच वर्ल्ड कप खेळत असलेल्या नूर अहमदने 3 विकेट्स घेतले.
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (C), अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.