सेमीफायनल आधी Mohammad Rizwanची मृत्यूशी झुंज; डॉक्टरांनीही केला होता असा दावा!
सेमीफायनल खेळला यामुळे भारतीय डॉक्टर आश्चर्यचकित झाले आहेत.
दुबई : टी-20 वर्ल्डकपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पण या सामन्यानंतर पाकिस्तानचा खेळाडू फलंदाज मोहम्मद रिझवानची बरीच चर्चा केली. या मोठ्या सामन्याच्या दोन दिवस आधी रिजवानला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता रिझवानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान लगेच बरा झाला आणि सेमीफायनल खेळला यामुळे भारतीय डॉक्टर आश्चर्यचकित झाले आहेत.
आयसीयूमध्ये उपचारादरम्यान खेळाडू म्हणत होता की, "मला खेळायचं आहे आणि संघासोबत राहायचं आहे. त्याचं ते ध्यैर्य नेहमी लक्षात राहील. ICC T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजाला छातीत संसर्ग झाला होता. त्यानंतर दोन रात्री आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर तो टीममध्ये दाखल झाला."
डॉक्टरला दिलं गिफ्ट
या बदल्यात रिझवानने उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरला खास भेट दिलीये. रिझवानने या डॉक्टरला त्याच्या नावाची सही असलेली पाकिस्तानी जर्सी दिली. यासाठी जगभरातून रिझवानचे कौतुक होतंय.
तपासणीनंतर रिझवानला छातीत संसर्गाची समस्या असल्याचं अहवालात आढळून आलं. त्यानंतर, 29 वर्षीय क्रिकेटपटूला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. उपचारादरम्यान रिझवानला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. दुबईच्या मेडियर हॉस्पिटलमधील फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. साहिर सैनालबादिन यांनी रिझवानवर उपचार केलेत.
डॉ. साहिर म्हणाले, 'रिझवानला गंभीर संसर्ग झाला होता. उपांत्य फेरीपूर्वी रिकव्हरी आणि फिटनेस ठेवणं अशक्य वाटत होते. यातून बरं होण्यासाठी साधारणपणे 5 ते 7 सात दिवस लागतात. पण त्याने प्रचंड इच्छाशक्ती दाखवली.