Mohammad Rizwan DRS Video : मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि यजमान ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी धुव्वा उडवला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 318 धावा करत पाकिस्तानला 264 धावांवर रोखलं होतं. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 262 धावा करत मजबूत आघाडी मिळवली होती. त्यानंतर पाकिस्तानला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने धारदार गोलंदाजी केली अन् पाकिस्तानला 237 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने 2-0 ने मालिकेवर कब्जा केलाय. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याचं पितळ उघडं पडल्याचं पहायला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं?


शान मसूद आणि बाबर आझम यांच्यातील भागेदारीनंतर पाकिस्तानचा विजय सोपा वाटत होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने ही जोडी फोडली अन् खेळाडूंना झुंजवलं. पाकिस्तानच्या मदतीला धावला तो मोहम्मद रिझवान... रिझवानने पाकिस्तानला 200 धावांवर पोहोचवल्यानंतर पॅट कमिन्सने सुत्र हातात घेतली. कमिन्सने 61 व्या ओव्हरमध्ये रिझवानचा पत्ता कट केला. कमिन्सने बाऊंसरचा मारा सुरू केला. त्यावेळी ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रिझवानने कमिन्सचा बॉल हुकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या ग्लोव्हजला बॉल लागला. मात्र, रिझवानने अंपायरच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. 


जणू काही बॉल उजव्या हाताला लागलाय, असं दाखवण्याचा प्रयत्न रिझवान करत होता. मात्र, पॅट कमिन्सने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला अन् रिझवानची पोलखोल झाली. कमिन्सचा बॉल ग्लोव्ह्जला स्पर्श करून गेल्याचं दिसलं अन् तिसऱ्या पंचांनी रिझवानला आऊट दिलं. 


पाहा Video



पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन) : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मिर हमजा.


ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड.