Mohammad Rizwan Become T20I vice captain : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट मालिकेत पाकिस्तानचा कचरा झाल्याचं पहायला मिळालं. तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश मिळालाय. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये पाकिस्तानचं नाक ठेचलं गेलंय. याची जखम अजूनही भरली गेली नसल्याने आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झालाय. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पीसीबीने नेमका कोणता निर्णय घेतलाय? पाहा.... (Mohammad Rizwan named Pakistan T20I vice captain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानला पाकिस्तान T20I संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. शाहीन शाह आफ्रिदीचा उपनियुक्त म्हणून रिझवानची पहिली नियुक्ती न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची T20I मालिका असेल, जी 12 जानेवारीपासून न्यूझीलंडमध्ये होणार आहे. 31 वर्षीय रिझवानने 85 टी-20 सामन्यांमध्ये एक शतक आणि 25 अर्धशतकांसह 2,797 धावा केल्या आहेत. तर विकेटकिपर म्हणून देखील रिझवानची कामगिरी चांगली राहिली आहे. 41 कॅच आणि 11 स्टंपिंगमुळे रिझवान अनेकांच्या नजरेत आला आहे.


काय म्हणाला Mohammad Rizwan?


पाकिस्तान T20I संघाचा उपकर्णधार म्हणून नाव मिळणं ही सन्मानाची गोष्ट आहे. माझ्यावर ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मी पीसीबीचा आभारी आहे. संघाच्या यशात योगदान देण्यासाठी मी कर्णधार, प्रशिक्षक कर्मचारी आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहे, असं मोहम्मद रिझवान याने म्हटलं आहे.



पाकिस्तानचा संपूर्ण संघ (Pakistan Team Full squad) : 


शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद रिझवान (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), आमिर जमाल, अब्बास आफ्रिदी, आझम खान (यष्टीरक्षक), बाबर आझम, फखर जमान, हारिस रौफ, हसीबुल्लाह, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, उसामा मीर आणि जमान खान.