मोहम्मद शमीला दिलासा, बीसीसीआयनं केला करार, मिळणार एवढे पैसे
पत्नीसोबत सुरु असलेल्या वादामुळे अडचणीत आलेल्या मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे.
मुंबई : पत्नीसोबत सुरु असलेल्या वादामुळे अडचणीत आलेल्या मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयनं अखेर मोहम्मद शमीसोबतच्या कराराचं नुतनीकरण केलं आहे. मोहम्मद शमीचा बीसीसीआयनं बी ग्रेडमध्ये समावेश केला आहे. यामुळे मोहम्मद शमीला वर्षाला ३ कोटी रुपये मिळणार आहेत. ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीसाठी खेळाडूंना ही रक्कम देण्यात येणार आहे. याचबरोबर शमीचा आयपीएल खेळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
पत्नीनं केलेल्या आरोपांमुळे मोहम्मद शमीची बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानं चौकशी केली. या चौकशीनंतर नीरज कुमार यांनी चौकशीचा अहवाल बीसीसीआयकडे सोपवला. यानंतर मोहम्मद शमीचा करार करण्याचा मार्ग मोकळा झाला.
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांनं मोहम्मद शमीवर मारपीट, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले आहेत. मोहम्मद शमीच्या पत्नीनं त्याच्याविरोधात केसही दाखल केली आहे. यातल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर बीसीसीआयनं शमीच्या चौकशीला सुरुवात केली होती.
खेळाडूंची ग्रेडिंग सिस्टीम
ग्रेड ए प्लस (७ कोटी रुपये)
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह
ग्रेड ए (५ कोटी रुपये)
अश्विन, रविंद्र जडेजा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एम.एस.धोनी, वृद्धीमान सहा
ग्रेड बी (३ कोटी रुपये)
के.एल.राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी
ग्रेड सी (१ कोटी रुपये)
केदार जाधव, मनिष पांडे, अक्सर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिव पटेल, जयंत यादव