नवी दिल्‍ली : सोशल मीडियात नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असणारा आणि विविध कारणांनी नेहमीच ट्रोल होणारा खेळाडू मोहम्मद शमी याला पुन्हा एकदा ट्रोलर्सने टार्गेट केलंय. मोहम्मद शमीने परिवारासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही कट्टरपंथींनी त्याच्या या फोटोवर टीका केली आहे. शमीने हा फोटो शेअर केल्यावर त्याच्या फॅन्सने हा फोटो लाईक केला, त्यावर कमेंट केल्यात आणि अनेकांनी शेअरही केला.



या फोटोवर अनेकांनी खूप चांगल्या कमेंट केल्या आहेत. कुणी त्याला वनडे मध्ये रेकॉर्ड करण्यास सांगतंय, तर काहींनी त्याच्या पत्नीचं आणि मुलीचं कौतुक केलंय. मात्र यात काही अशाही कमेंट आहेत ज्याचा सामना शमीने याआधीही अनेकदा केला आहे. 




या फोटोत शमीची पत्नी डोक्यावर काहीच न घेता किंवा बुरखा परिधान करून नाहीये. त्यावरूनच काही कट्टरपंथीयांनी या फोटोवर टीका केलीये. काही कमेंटमध्ये फारच खालच्या शब्दात टीका करण्यात आली आहे. 



दरम्यान, एकाने फोटोवर कमेंट केलीये की, 'भाऊ फतव्याची भीती नाही का वाटत, पत्नीला बुरख्यात ठेव’. तर काहींनी या कट्टरपंथींना चिमटे काढले आहेत.