T20 World Cup: जवळपास निश्चित! बुमराहची जागा घेणार `हा` घातक गोलंदाज
बुमराहच्या जागी टीममध्ये समाविष्ट होणारा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे 2022 च्या T20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला. जसप्रीत बुमराह वर्ल्डकप बाहेर पडणं टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी टीम इंडियाला त्याची बदली खेळाडू मिळाला आहे. बुमराहच्या जागी टीममध्ये समाविष्ट होणारा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
बुमराहच्या जागी या खेळाडूला संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यानंतर जसप्रीत बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं. पीटीआयच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहच्या जागी आता स्टार गोलंदाज मोहम्मद शमी 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीचा स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता, मात्र आता तो महत्त्वाच्या टीमचा भाग असू शकतो.
लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
जसप्रीत बुमराहला टी20 वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीच्या जागी स्थान दिलं जाईल, जो हळूहळू सामना तंदुरुस्त होतोय आहे आणि येत्या तीन ते चार दिवसांत तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल अशी अपेक्षा आहे.
एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "मोहम्मद शमी तंदुरुस्त असल्यास त्याला पहिलं प्राधान्य असेल."
पुढील आठवड्यात तो टीममध्ये सामील होईल. मोहम्मद शमीला नुकताच कोरोना झाला होता, पण आता तो कोरोनामधून बरा झाला आहे. आयसीसीच्या नियमांनुसार टी-20 वर्ल्ड कपच्या 15 दिवस आधी टीम इंडिया मुख्य टीममध्ये राखीव खेळाडूंचा समावेश करू शकते.