मुंबई : 3 दिवसांपासून चर्चेत असणारा मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहे. क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीने केलेल्या आरोपावर शमीच्या भावाने आता प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शमीच्या भावाने यावर नाराजी दर्शवली आहे. मोहम्मद शमीच्या भावाने म्हटलं की, 'कोणाच्या तरी सांगण्यावरुन हे सगळं होत आहे. 25 दिवसांपूर्वीच त्या घरी आल्या होत्या. आता इतक्या दिवसात लगेच काय झालं की ते आरोप करु लागले. जेव्हा आमच्याकडे होत्या तेव्हा याबाबत काहीही म्हटलं नाही.'


'2-3 दिवस मध्ये फोनवर पण चर्चा झाली पण याबाबत काहीच सांगितलं नाही. आता अचानक असं काय झालं की असे आरोप होऊ लागले आहेत. हे कोणालाही कळत नाही आहे. हे कोणाच्या तरी सांगण्यावरुन होत आहे. यामुळे शमीचं क्रिकेट करिअर अडचणीत आलं आहे.'