कोलकाता : भारतीय फास्टर बॉलर मोहम्मद शमी त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपामुळे अडचणीत आलाय. दरम्यान,  हसन जहॉंचा पहिला पती शेख यांनी मोठा खुलासा केलाय. ती खूप महत्वाकांक्षी आहे. तसेच पहिल्या पतीपासून हसीनला दोन मुलं आहेत.


हसीनचा मोठा गौप्यफोट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मोहम्मद शमी याचे महिलांशी अनैतिक संबंध आहेत. तसेच तो मला मारहाण करतो असे आरोप करत हसीनने मोठा गौप्यफोट केलाय. पाकिस्तानी कनेक्शन आणि मॅच फिक्सिंग यात शमीचा हात आहे. त्यामुळे तो अडचणीत आलाय. बीसीसीआयने त्याच्यासोबत दूर राहणे पसंत केलेय.  


शमीवर गुन्हा दाखल


 दरम्यान, कोलकाता पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तर दुसरीकडे हे षडयंत्र असल्याचा आरोप शमीने केला आहे. त्याने हे आरोप फेटाळलेत.


पहिल्या पतीची माहिती


तर दुसरीकडे या सर्व प्रकरणात हसन जहॉंचा पहिला पती शेख सैफुद्दीनचे नवे वक्तव्य समोर आलेय. हसीन जहा अत्यंत महत्त्वकांक्षी महिला आहे. हसीनने मला का सोडलं ते माहीत नाही. मात्र ती अत्यंत महत्त्वकांक्षी आहे. सध्या आमच्यात कोणताही संपर्क नाही, असा खुलासाही त्याने केलाय.


 २००२ मध्ये प्रेम विवाह


हसन जहॉं आणि शेख सैफुद्दीनने  २००२ मध्ये प्रेम विवाह केला. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. सैफुद्दीन आणि हसन जहॉं यांच्या दोन मुली आहेत, ज्यापैकी एक दहावीत, तर दुसरी सहावीत शिकत आहे.