Mohammed Siraj: भारत आणि बांगलादेश (BAN vs IND) यांच्यामध्ये पहिली टेस्ट सिरीज (BAN vs IND test series) खेळवली गेली. 14 डिसेंबर रोजी या दोन्ही टीम्समध्ये पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशी टीमला 513 रन्सचं आव्हान दिलं होतं. तर बांगलादेशाच्या टीमचा पहिला डाव अवघ्या 150 रन्सवर आटोपला. तर बांगलादेशाचा दुसरा डाव सुरु असताना पुन्हा मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) बांगलादेशाच्या खेळाडूसोबत बाचाबाची झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशाच्या ओपनर जोडीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. नझमुल हुसैन शंतो आणि झाकिर हसन यांच्यामध्ये शतकी भागीदारी आहे. मात्र याच दरम्यान भारतीय टीमचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सातत्त्याने शंतोला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. ज्यावर नझमुलने खूप वेगळ्या पद्धतीने रिएक्ट केलं. सध्या सिराजच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.


Mohammed Siraj ने शंतोला केलं स्लेज


भारतीय टीमचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराजने बांगलादेशी टीमविरोधात तुफान गोलंदाजी करत फलंदाजांची दाणादाण उडवली. सिराजने त्याच्या उत्तम गोलंदाजीच्या जोरावर 3 विकेट्स घेत आपलं नाणं खणखणीत वाजवलं होतं. 


तर बांगलादेशाच्या दुसऱ्या डावामध्ये सिराजने टीम इंडियाला विकेट मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. यावेळी सिराज बांगलादेशाचा ओपनर नझमुल हुसैन शंतो याला स्लेज करत असल्याचं दिसून आलं. सिराजने शंतोला एकदा नाही तर दोनवेळा स्लेज करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी शंतो शांत होता आणि केवळ हसताना दिसून आला. त्याच्या या रिएक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.



Mohammed Siraj आणि लिटन दास मध्येही झाला होता वाद 


ही घटना बांगलादेशाचा पहिला डाव सुरु असताना 14 व्या ओव्हरमधील आहे. वेगवाग गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या गोलंदाजीने बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण उडवली. यावेळी ओव्हररचा पहिला बल लिटन दास खेळत होता. त्याने हा बल उत्तम पद्धतीने डिफेंस केला. यावेळी सिराज काहीसा भडकला. सिराजने रागाच्या भरात लिटन दासकडे पाहिलं आणि अपशब्द वापरले. सिराजचा पार चढलेला पाहून लिटन दास देखील मागे हटला नाही. त्याने, कानाच्या मागे हात धरत, ऐकू येत नसल्याची एक्शन केली. पुढच्याच बॅालवर लिटन क्लिन बोल्ड झाला. सिराजनेच त्याची विकेट काढली.