नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) ने युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे विधान केले आहे. ऋषभ पंतला भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नेमले गेले तर आश्चर्य वाटणार नाही असे मोहम्मद अझरुद्दीनला वाटते. त्याने यासंदर्भात ट्वीट केले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देताना ऋषभ पंतने चांगली खेळी केली. त्याने इंग्लंडविरुद्धही तिन्ही फॉर्मेटमध्ये शानदार प्रदर्शन केले. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर दिल्लीच्या कॅपिटल्सने ऋषभ पंतला कॅप्टन बनवले. पंतचा पॉकेट साइज आक्रमक स्फोटक अंदाज  टीम इंडियाच्या भविष्यासाठी चांगला असल्याचे अझरुद्दीनने म्हटले.


'गेले काही आठवडे ऋषभ पंतसाठी छान गेले आणि त्याने तिन्ही फॉर्मेटमध्ये स्वत: ला सिद्ध केले. भविष्यात निवड समितीने पंतला टीम इंडियाचा कर्णधार म्हणून निवडले तर आश्चर्य वाटणार नाही. पंतच्या आक्रमक खेळामुळे टीम इंडियाला येत्या काळात बराच फायदा होईल असेही त्याने ट्वीटमध्ये म्हटले.



श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) दुखापतीनंतर दिल्लीच्या कॅपिटल्सचे (Delhi Capitals)नेतृत्व कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. काही दिग्गजांचा असा विश्वास होता की स्टीव्ह स्मिथ किंवा रविचंद्रन अश्विन यांना कर्णधार बनवले जाऊ शकते. काहींनी म्हटले की, अजिंक्य रहाणे दिल्लीचा कर्णधारही होऊ शकतो. पण अखेरिस शेवटी ऋषभ पंत (Rishabh Pant)याला संघाचा कर्णधार म्हणून निवडले गेले. ऋषभ पंत बराच काळापासून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)संघासोबत आहे. आणि येणाऱ्या काळात तो भारताचे भविष्य आहे. अशा परिस्थितीत दिल्लीच्या मॅनेजमेंटने चांगला निर्णय घेतला.


आयपीएल 2021 (IPL 2021) मधील पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात होईल. यानंतर सीएसके आणि दिल्ली कॅपिटलचे संघ दुसर्‍या सामन्यात 10 एप्रिलला आमनेसामने असतील. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. पण यावर्षी पुन्हा एकदा भारतात आयपीएलचे आयोजन होत आहे.