Mohammed Shami : शमीने उठवला किवींचा बाजार! वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू
IND vs NZ semifinal : एकदिवसीय विश्वचषकात 33 वर्षीय मोहम्मद शमी (Mohammed Shami) 50 बळी घेणारा सातवा आणि पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीने त्याच्या 17 व्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.
IND vs NZ, Mohammed Shami Record : बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप सेमीफायनलचा सामना (IND vs NZ semifinal) खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 70 रन्सने पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमीने (Mohammed Shami) 7 विकेट्स घेतल्या. टीम इंडिया संकटात असताना शमी धावून आला अन् अफलातून कामगिरीचं प्रदर्शन केलं. न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद शमीने 7 विकेट्स घेताच शमीने अनेक विक्रम मोडले आहेत.
पहिला भारतीय गोलंदाज
न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात भारताचा मोहम्मद शमी हा एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद 50 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. फक्त 17 सामन्यात शमीने अशी कामगिरी करून दाखवली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 33 वर्षीय मोहम्मद शमी (Mohammed Shami) 50 बळी घेणारा सातवा आणि पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय.
झहीर खानचा रेकॉर्ड मोडला
एकाच वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम देखील त्याने आपल्या नावावर केला आहे. झहीर खान याने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, आता शमीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 22 विकेट्स नावावर केल्या आहेत. फायनलमध्ये देखील शमीने आपल्या गोलंदाजीची धार दाखवेल, यात काही शंका नाही.
वसीम अक्रमचा रेकॉर्ड मोडणार?
वसीम अक्रमच्या रेकॉर्डपासून मोहम्मद शमी एक पाऊल लांब आहे. वसीम अक्रमने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसाठी 55 विकेट्स घेतल्या आहे. तर शमीने आत्तापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 54 विकेट्स घेतल्या आहेत. तर ट्रेंड बोल्टला शमीने मागे टाकलंय. बोल्डने 53 विकेट्स नावावर केल्या आहेत. त्याचबरोबर फायनलमध्ये शमी पुन्हा पाचचा पंच लावत मिशेल स्टार्कचा 59 विकेट्सचा रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल विचारला जातोय.