वर्ल्ड कप फायनलनंतर ड्रेसिंग रुममध्ये नक्की काय झालं? Mohammed Shami ने सांगितला किस्सा, म्हणाला `मोदी आले अन्...`
Mohammed Shami On World Cup Final : वर्ल्ड कप फायनलच्या जखमा अजूनही भरून निघाल्या नाहीत. अशातच आता वर्ल्ड कप स्टार मोहम्मद शमीने ड्रेसिंग रुममधील (Indian Dressing room) वातावरण आणि मोदींच्या ड्रेसिंग रुममधील आगमनावर मोठं वक्तव्य केलं आहे.
Indian Dressing room : भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपची (World Cup Final) फायनल 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादला खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) भारताचा पराभव करून सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. त्यामुळे 130 कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय. वर्ल्ड कप फायनलच्या जखमा अजूनही भरून निघाल्या नाहीत. अशातच आता वर्ल्ड कप स्टार मोहम्मद शमीने ड्रेसिंग रुममधील वातावरण आणि मोदींच्या ड्रेसिंग रुममधील आगमनावर मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला Mohammed Shami ?
वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमधील (World Cup Final) पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये कोणी कोणाशी बोलत नव्हतं आणि कोणी जेवणही करत नव्हतं. अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले, हे सर्वांना आश्चर्यचकित करणारं होतं आणि त्यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधला. तो संवाद आमच्यासाठी खूप महत्वाचा होता. जेव्हा पंतप्रधान तुम्हाला भेटायला येतात, तेव्हा तुम्हाला त्यांना सन्मान द्यावा लागतो आणि तुमची मान ताठ ठेवायला लागते पण पराभवानंतर माझ्या डोळ्यात पाणी होतं, असं मोहम्मद शमीने सांगितलं आहे.
आमच्या सर्वांसाठी मोदींजीची भेट एक सरप्राईज होतं. आम्हाला ड्रेसिंग रुममध्ये मोदीजी भेटायला येत आहेत, हे माहित नव्हतं. सामन्यानंतर खूप दुखावलेलो होतो. आम्ही दोन महिने खूप चांगले खेळलो, पण एक वाईट दिवस होता, असं मोहम्मद शमी याने म्हटलं आहे.
आणखी वाचा - "...म्हणून धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त केली", राजीव शुक्ला यांनी सांगितलं कारण!
दरम्यान, भारताला मिळालेल्या विजयानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद शमी याच्या नावाची चर्चा रंगली. आपल्या सर्वात घातक गोलंदाजीचं प्रदर्शन मोहम्मद शमीने केलं आहे. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये मोहम्मद शमीने विकेट्सचा पाऊस पाडला अन् टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. अनेक खेळाडू येतात आणि जातात. देशासाठी जो खेळतो, तो खरा हिरो... वर्ल्ड कप गाजवणाऱ्या दोन खेळाडूंना भारतीय संघ कधीच विसरू शकत नाही. पहिला म्हणजे युवराज सिंह आणि दुसरा मोहम्मद शमी...