Mohammed Shami India vs Bangladesh Test Series: बांगलादेश दौऱ्यावर (Bangladesh) गेलेल्या टीम इंडियाला (Team India) अजून एक मोठा धक्का बसला आहे. आधी रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमधून बाहेर जाणार असल्याची शक्यता असून आता टीम इंडियामध्ये अजून एक खड्डा पडणार आहे. मोहम्मद शमीच्या रूपाने हा दुसरा धक्का लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे पहिलाच वनडे सिरीजमधून बाहेर पडला आहे. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याने तो खेळू शकत नाही. त्याच्या जागी टीम इंडियामध्ये उमरान मलिकचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, शमी टेस्टमधूनही बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे.


NCA कडून शमीचा रिपोर्ट अजून आला नाही


क्रिकबझ वेबसाईटने त्यांच्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, शमी अजून त्यांच्या खांद्याला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. अशा परिस्थितीत तो टेस्ट टीममधून देखील बाहेर पडू शकतो. शमी सध्या बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिहॅबिलीटेशन सुरु आहे. 


शमीने हॉस्पिटलमधला फोटो केला होता शेअर


नुकतंच मोहम्मद शमीचे हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले होते. यामध्ये शमी त्याची ट्रीटमेंट घेताना दिसतोय. शमीने स्वतः हा फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. 


शमीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'दुखापत तुम्हाला प्रत्येक क्षणाचं कौतुक करायला शिकवते. माझ्या करियरमध्ये मला अनेक दुखापती झाल्या आहेत. यामुळे तुम्हाला एक दृष्टीकोन मिळतो.


टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड


भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कप्तान), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.