मुंबई : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आशिया चषकसाठी (Asia Cup 2022) टीम इंडियामध्ये शमीला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे तो सध्या एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळत नाहीये. सध्या तो विश्रांती घेत असून आपले इतर छंद जोपासत आहे. आपला वेगवान गोलंदाजीने त्याने अनेक दिग्गज खेळाडूंच्या विकेट घेतल्या आहेत. (Indian cricketer Mohammad Shami buys Jaguar F-Type sports car worth Rs. 1 Crore)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शमी एक नवीन स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. त्याचे अनेक व्हिडिओही त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. शमी त्याच्या कारचा व्हिडिओ शेअर करताना खूप आनंदी दिसत आहे. शमीची चमकणारी लाल कार पाहून त्याचे चाहतेही त्याचे अभिनंदन करत आहेत. शमीने खरेदी केलेल्या या नवीन कारचे फीचर्स काय आहेत. ते देखील जाणून घेऊयात.


कारची किंमत किती ?


मोहम्मद शमीने जग्वार कंपनीची एफ प्रकारची कार खरेदी केली आहे. या कारचे अनेक व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 97.93 लाख रुपये आहे म्हणजेच तिची ऑन रोड किंमत 1 कोटी रुपये आहे.



कारची वैशिष्ट्ये


रिपोर्ट्सनुसार, जग्वार कंपनीची ही कार अवघ्या 5.7 सेकंदात 100 किमी/तासचा वेग पकडते. याशिवाय कारमध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्सही देण्यात आले आहेत. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ते एका लिटरमध्ये 12.3 किमी पर्यंत धावते. या कारचे शक्तिशाली इंजिन V8 331 kW आहे, याशिवाय दोन पेट्रोल इंजिन 1997 cc आणि 5000 cc चा पर्याय आहे. ही कार मुख्यतः 296 किमी/ताशी वेगाने धावू शकते.


शमीकडे टोयोटा फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू 5 सीरीज आणि ऑडी कार देखील आहे. याशिवाय त्यांच्याकडे बाइक्सचेही चांगले कलेक्शन आहे.