Mohammed Shami open challenge : वनडे वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमी दुखापतीमुळे टीम इंडियामधून बाहेर आहे. शमी दुखापतीमधून रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, शमी आपल्या सोशल मीडियावरून टीम इंडियाचा चिअर्स करतोय. मोहम्मद शमीने अमर उजालाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी शमीने प्रत्येक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली. यावेळी शमीने फिटनेसवर खुलासा केला आणि पाकिस्तानला सडकून उत्तर दिलं. 


काय म्हणाला मोहम्मद शमी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिकव्हरी खेळाडूच्या जीवनाचा भाग असतो. माझा प्रयत्न आहे की, मी रिकव्हरीचे माझे व्हिडीओ शेअर करत असतो, तरी देखील लोकांचं एवढं प्रेम आहे की, त्यांना अजून माहिती पाहिजे असते. चाहत्यांचं प्रेम माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी लवकर फिट होण्याचा प्रयत्न करतोय, असं मोहम्मद शमीने यावेळी म्हटलं आहे. 


पाकिस्तानचं हे पॉलिटिक्स आहे. वर्ल्ड कपमध्ये आमच्यावर टीका केली होती की, याच्या बॉलमध्ये डिव्हाईस आहे. जर तुम्ही बॉलमधून एखादी कलाकारी दाखवत असाल तर ती तुमची कला आहे. त्यावर जळण्याची गरज नाही. मला पाकिस्तानचा रिप्लाय आला नाही, तर त्यांनी मला प्रत्युत्तर दिलं तर मी त्यांना सडकून उत्तर देऊ शकतो, असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे. 


मी प्रत्येक स्किल्सचा सलाम करतो. पण माणूस म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या यशात आनंद झाला पाहिजे. मी वर्ल्ड कपचा बॉल माझ्यासमोर ठेवला आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बॉलची तपासणी करू, असं खुल्लं आव्हान मोहम्मद शमीने दिलं आहे. 


दरम्यान, 2023 च्या वनडे वर्ल्ड कप आमच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर होता. मला वाटतं तो दिवस आमचा नव्हता. लक शेवटी मॅटर करतो. मी त्यादिवशी 4-5 विकेट्स घेतले असते तर सामना खूप वेगळा असता. पण संपूर्ण संघाने कष्ट घेतले पण तो दिवस आमचा नव्हता, असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे.


मोहम्मद शमीचं करियर


मोहम्मद शमीने 6 जानेवारी 2013 रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आत्तापर्यंत एकूण 101 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 195 विकेट्स नावावर केल्या आहेत. तर 64 कसोटी सामन्यात शमीने 229 विकेट्स घेतल्या आङेत. तसेच शमीने टी-ट्वेंटीमध्ये 23 मॅचमध्ये 24 विकेट्स नावावर केल्या आहेत.