T20 World Cup: `हा` खेळाडू होणार ऑस्ट्रेलियाला रवाना; दीपक चहरला करणार रिप्लेस?
वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत चहरची जागा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय.
मुंबई : टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलंय. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे वर्ल्डकप बाहेर झाल्यानंतर दीपक चहर देखील दुखापत ग्रस्त झाला. दरम्यान यानंतर वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत चहरची जागा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान अशातच आता एक आनंदाची बातमी समोर आलीये. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर टीम इंडियामध्ये सामील होणार आहे.
टीम इंडिया वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलीये. दरम्यान टीमला दोन प्रॅक्टीस सामनेही खेळायचे आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यात इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे, तर दुसरा सामना आज खेळला जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाला वर्ल्डकपमधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे.
दरम्यान, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर टीमचा भाग होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचणार आहेत. हे 3 गोलंदाज जेव्हा ऑस्ट्रेलियाला पोहोचतील, तेव्हाच त्यांच्यापैकी एक गोलंदाज बुमराहची जागा घेईल. शक्यतांनुसार मोहम्मद शमी बुमराहला रिप्लेस करण्याची शक्यता आहे.
वर्ल्डकपसाठी टीम इंडियामधून मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांना भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते. दीपक दुखापतीमुळे बाहेर आहे. अशा परिस्थितीत सिराज आणि शार्दुलला पाठवले जात आहे. बुमराहच्या जागी शमीला खेळवल्यास सिराज-शार्दुल राखीव असतील.
हे खेळाडू भारतातच राहणार
बीसीसीआयने यापूर्वी 4 खेळाडू राखीव म्हणून ठेवलं होतं. यामध्ये शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांचा समावेश होता. अशा परिस्थितीत टीम मॅनेजमेंटने श्रेयस आणि रवीला भारतातच राहण्यास सांगितलंय. त्यामुळे आता फक्त शमी, सिराज आणि शार्दुल हे राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.