Mohammed Shami Wife Hasin Jahan Video: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायमच चर्चेत असलेली क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आहे. हसीनने रंगपंचमीच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हसीन जहाँ डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओमध्ये हसीन जहाँ गुलाल उधळताना दिसत आहे. पाण्यामध्ये मनसोक्त भिजत हसीन जहाँ तिच्या लेकीबरोबर आणि अन्य 2 मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे. 


अनेकांनी केली टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जय-जय शिव शंकर, कांटा लगे ना कंकड' गाण्यावर हसीन जहाँ अगदी घट्ट ड्रेसमध्ये डान्स करताना पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर तिच्या समर्थक आणि चाहत्यांनी तिचा हा फिल्मी स्टाइल डान्स फारच आवडला आहे. इन्स्टाग्रामवर हसीन जहाँला 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेकदा तिला तिच्या रिल्ससाठी आणि पोस्टसाठी ट्रोलही केलं जातं. सध्याच्या व्हिडीओवरुनही असाच वाद सुरु झाला आहे. अनेकांनी तिला अशाप्रकारे अखूड आणि घट्ट कपड्यांमध्ये डान्स करणं म्हणजे अंगप्रदर्शन करण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे. क्रिकेटपटू मोहम्मद शमीबरोबर मतभेद झाल्यानंतर हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासूनच तिच्यावर शमीच्या चाहत्यांबरोबरच अनेकजण टीका करताना दिसतात.


तिच्या व्हिडीओची चर्चा; पण व्हिडीओत काय?


दुसरीकडे हसीन जहाँ सुद्धा शमीसंदर्भात सूचक पद्धतीने रिल्सच्या माध्यमातून भाष्य करत प्रसारमाध्यमांबरोबरच समर्थक आणि टिकाकारांचेही लक्ष वेधून घेत असते. सध्या तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर पुन्हा तिची चर्चा दिसत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



शमी या अशाच कारणांमुळे वेगळा झाला असेल


सोशल मीडियावर अनेकांनी टीका करताना या अशा गोष्टींमुळेच शमी तुझ्यापासून वेगळा झाला असणार अशा अर्थाच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने तर ही मुस्लीम असूनही अशी नाच-गाणी का करत आहे? असा प्रश्न विचारला आहे. काहींनी या डान्सला अश्लील असा करार दिला आहे.



शमी हा हसीनचा दुसरा नवरा


शमी आणि हसीन जहाँमध्ये मागील बऱ्याच वर्षांपासून कोर्टात वाद सुरु आहे. हसीन जहाँने पतीचे दुसऱ्या महिलांबरोबर संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच हसीन जहाँने शमीच्या कुटुंबियांवरही गंभीर आरोप करताना बलत्काराचा प्रयत्न, हुंड्यासाठी छळ केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे शमी हा हसीन जहाँचा पहिला नवरा नसून हे तिचं दुसरं लग्न होतं. कोलकात्यामधील बीरभूममध्ये राहणाऱ्या हसीन जहाँचं पहिलं लग्न ती राहत असलेल्या परिसरामध्ये किराणामालाचं दुकान चालवणाऱ्या शेख सैफुद्दीनबरोबर झालं होतं. मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर तिने शमीशी लग्न केलं होतं.


नक्की वाचा >> गंभीरचं कौतुक ऐकून गावसकर संतापले! थेट नाव घेत म्हणाले, 'पुढील काही सामन्यांमध्ये...'


2 वर्ष डेट केलं अन् मग लग्न


मॉडलिंगची हौस असल्याने हसीन जहाँ कोलकात्याला आली. 2012 मध्ये तिची आणि शमीची पहिली भेट झाली. तेव्हा शमी सध्या इतका लोकप्रीय नव्हता. 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी घरच्यांच्या संमतीने 6 जून 2024 रोजी लग्न केलं. या दोघांना एक मुलगीही आहे. सध्या ही मुलगी हसीन जहाँबरोबरच राहते. सध्या शमीवर शस्त्रक्रीया झाल्याने तो आराम करत असून यंदाच्या आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सच्या संघाकडून खेळताना दिसणार नाही.